तहसील कार्यालयांना ठोकले टाळे
By admin | Published: June 6, 2017 10:50 PM2017-06-06T22:50:53+5:302017-06-06T22:51:47+5:30
सरकारविरोधात घोषणा : सहाव्या दिवशीही शेतकरी संपाची धग कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकरी संप आंदोलनाच्या मंगळवारी सहाव्या दिवशी येवल्यात आंदोलनाची धग कायम राहिली. किसान क्र ांती मोर्चाच्या आयोजकांनी दिलेल्या आदेशांनुसार समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयास ताळे ठोकले. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही...संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे..स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झालाच पाहिजे या घोषणांच्याच निनादात तहसील कार्यालयाला ताळे ठोकले, त्यांनतर आंदोलनकर्त्यांनी मुख्य आवारात सुमारे दोन तास धरणे धरले. आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार
घडू नये म्हणून राज्य राखीव दलाचा मोठा
फौज फाटा तैनात करण्यात आला होता.प्रशासनाने मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावल्याने तणावात आणखी भर पडली. सरकार ला पोलीस बळाचा वापर करून दहशत निर्माण करायची असल्याची टीका आंदोलकांनी केली.येवला : येथे आंदोलनाची वेळ मंगळवारी सकाळी ११ वाजता होती. मात्र सकाळी ९ पासून तहसील कार्यालय आवारास छावणीचे स्वरूप आले होते.त्यातच येवला तालुयातील पिंपरी येथील तरु ण शेतकरी व किसान क्र ांती मोर्चाचे कार्यकर्ते नवनाथ चांगदेव भालेराव या ३० वर्षाच्या तरण्या बांड शेतकर्याने सोमवारी नापिकी,कर्ज बाजारीपणा यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली.पाच दिवस संप करून,आंदोलने करूनही सरकारला जाग न आल्याने व कर्ज माफीची कोणतीही आशा न उरल्याने नवनाथ भालेराव यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर चार लाखांचे कर्ज होते.
आधी निवेदन, नंतर मात्र...
आत्महत्या केलेल्या शेतकर्याला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्र म करून टाळे लावण्याचे स्थिगत करण्याचे ठरले होते.तालुक्यात पिंपळगाव टोल नाका येथील काही समाज कंटकांनी केल्या लुटी प्रकरणाने तालुका प्रशासन आण िपोलीस यंत्रणा सतर्क झाले आहे. तहसील कार्यालय बंद करू नये अशी विनंती तहसीलदार नरेश बिहरम यांनी केली होती. आंदोलकांच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकर्यास संतू पाटील झांबरे यांनी श्रद्धांजली वाहिली, आण िनिवेदन दिले.
...त्यांना केली राष्ट्रवादीने साथ
राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे स्थानिक नेते संभाजीराजे पवार,तालुका प्रमुख झुंजार देशमुख,
अरु ण काळे, अर्जुन कोकाटे यांनी
शेवटच्या क्षणी आक्र मक होत आम्ही तहसीलदार यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणारच, असा आग्रह धरला.पोलिस निरीक्षक संजय पाटील त्यांनी तहसील यांच्या कक्षाला टाळे न लावता मुख्य गेटला लावा असे सांगत आंदोलकांना बाहेर काढले..
त्यांनतर मुख्य दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. त्यांनतर तासभर तहसील कार्यालयात तासभर घोषणाबाजी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनामध्ये संतू पाटील झांबरे, संभाजीराजे पवार, अर्जुन कोकाटे, अरु ण काळे, झुंजार देशमुख छगन आहेर, राधाकिसन सोनवणे,बापू पगारे,वसंत पवार, प्रकाश वाघ, बाळासाहेब लोखंडे, भागवत सोनवणे, कांतीलाल साळवे, ज्ञानेश्वर दराडे, शिवाजी भालेराव, संजय पगारे, रामनाथ उशीर, सुदाम भालेराव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे,भाऊसाहेब सोमासे, भास्कर भागवत, कांतीलाल साळवे, नाना लोंढे,यांचेसह शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.निफाड तहसील कार्यालयात आंदोलन
निफाड : येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलकांनी निफाड तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेटला टाळे ठोकले याप्रसंगी अनिल कुंदे ,हरिश्चंद्र भवर , शिवाजी ढेपले , राजेंद्र बोरगुडे , संपत व्यवहारे यांची भाषणे झाली याप्रसंगी दत्तात्रय डुकरे , हरिश्चंद्र भवर राजेंद्र बोरगुडे ,शिवाजी ढेपले , बापू कुंदे, किसन कुंदे ,सुरेश कापसे , रमेश जाधव संपत व्यवहारे , कृष्णा नागरे , बाळासाहेब रंधवे , रघुनाथ कुंदे , संदीप गाजरे, संपत ढेपले , साहेबराव कुंदे ,शरद ढेपले ,दत्तू मोगल ,सदाशिव धारराव , शंकर हिंगमिरे , साहेबराव कर्वे , समाधान कुंभार्डे , दादा धारराव आदींसह शेतकरी उपस्तीत होते. शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून उगाव येथे मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवला होता त्यामुळे आठवडे बाजारात जाणारी उलाढाल ठप्प झाली होती. शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी तालुक्यातील उगाव , कोठूरे या गावात शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले.