शेतकऱ्यांचे कांदा अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 09:38 PM2019-09-08T21:38:53+5:302019-09-08T21:39:27+5:30

येवला : शेतकऱ्यांचे कांदा अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिले आहेत.

Tahsildar orders not to class farmers in onion subsidy loan account | शेतकऱ्यांचे कांदा अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करण्याचे तहसीलदारांचे आदेश

शेतकऱ्यांचे कांदा अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करण्याचे तहसीलदारांचे आदेश

Next
ठळक मुद्देअनुदान बचत खात्यात वर्ग न करता शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यास सुरवात केली.

येवला : शेतकऱ्यांचे कांदा अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीमधून सावरण्यासाठी मदत म्हणून कांदा अनुदान शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येत होते. मात्र बँकांनी मनमानी पद्धतीने शेतकºयांच्या अनुदानावर डल्ला मारत ते अनुदान बचत खात्यात वर्ग न करता शेतकºयांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यास सुरवात केली.
हि बाब भारतीय जनता पार्टी व भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांच्या लक्षात येताच त्यांनी येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी सर्व बँकांना सरकारी अनुदान कर्ज खात्यात वर्ग न करता बचत खात्यात वर्ग करावे असे आदेश दिले. निवेदन देते वेळी भाजप येवला शहराध्यक्ष आनंद शिंदे, प्रा.नानासाहेब लहरे, मयूर मेघराज, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Tahsildar orders not to class farmers in onion subsidy loan account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा