तहसीलदार, बीडीओंना निलंबित करण्याची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:14 AM2018-07-20T01:14:30+5:302018-07-20T01:15:31+5:30
नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत टळून गेल्यावरही त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी अचूक माहिती न दिल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या मुदतीत निवडणुका घेता आल्या नाहीत, त्याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन नाशिक जिल्ह्णाच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गटविकास अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सर्वांनाच धारेवर धरत ग्रामपंचायतींची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची अशी विचारणा केली. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जी पहिली बैठक ग्रामपंचायतीची होईल त्या तारखेपासून ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी धरला जात असताना त्याबाबतची माहिती गटविकास अधिकाºयास असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना धारेवर धरताना ग्रामपंचायत सदस्यांबाबत चुकीची माहिती प्रशासनाला दिली जात असल्याचा ठपका ठेवला. एकीकडे संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला जात असताना ग्रामपंचायत सदस्य वा सरपंचाकडे शौचालय नसल्याचे अपिले कशी काय दाखल केली जातात, असा सवाल त्यांनी विचारला व याबाबत गावपातळीवरूनच दिशाभूल व चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींच्या जागेवर अतिक्रमणाची बाबही अशाच प्रकारची असून, सदस्यांकडून अतिक्रमण केले जात असताना ग्रामसेवक कधी अतिक्रमण झाले नाही, असा अहवाल देतो व कधी अतिक्रमण केले आहे, अशी दुहेरी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांची असल्याचे सांगितले.
सरपंचाची निवडणूक तहसील कार्यालयामार्फत पार पाडली जात असल्यामुळे त्यांनीही याबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, यापुढे ग्रामपंचायतीची माहिती पाठविण्याची संयुक्त जबाबदारी गटविकास अधिकारी व तहसीलदारांची असून, त्यात कुचराई केल्यास थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला