आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची तहसिलदारांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 06:22 PM2019-01-21T18:22:39+5:302019-01-21T18:28:08+5:30
मालेगाव : गेल्या शुक्रवारी तालुक्यातील तिघा शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. सोमवारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी नांदगाव बु।। येथे चेतन केदा बच्छाव व सायने खुर्द येथील वसंत बंकट सोनवणे या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तिघा शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणी येथील तहसिल कार्यालयात नोंद घेण्यात आली आहे.
मालेगाव : गेल्या शुक्रवारी तालुक्यातील तिघा शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. सोमवारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी नांदगाव बु।। येथे चेतन केदा बच्छाव व सायने खुर्द येथील वसंत बंकट सोनवणे या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तिघा शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणी येथील तहसिल कार्यालयात नोंद घेण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी येथील तहसिल कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबाबत तहसिलदार देवरे यांनी कुटुंबियांची माहिती जाणून घेतली. पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिघांचे प्रस्ताव सादर केले जाणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र इंगळे यांनी तालुक्यातील कंधाणे येथील आत्महत्याग्रस्त ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच कुटुंबाला आधार म्हणून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यावेळी कोमलसिंग राजपूत, सुनिल देवरे, समाधान शेवाळे, निंबा पवार, गोकुळ गर्दे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.