महिलांच्या छेडछाडीविरोधात ताईगिरी मालेगाव : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:48 PM2017-09-17T23:48:31+5:302017-09-18T00:06:58+5:30

महिलांची छेडछाड करणाºयांना जागीच चोप देण्यासाठी ताईगिरी पथक स्थापन केल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Taiagiri Malegaon: Trupti Desai of Bhumata Brigade press conference against women's teasing | महिलांच्या छेडछाडीविरोधात ताईगिरी मालेगाव : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद

महिलांच्या छेडछाडीविरोधात ताईगिरी मालेगाव : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद

Next

मालेगाव : महिलांची छेडछाड करणाºयांना जागीच चोप देण्यासाठी ताईगिरी पथक स्थापन केल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमती देसाई बोलत होत्या. देसाई म्हणाल्या, राज्यातील दारू दुकाने बंद व्हावेत, महाराष्टÑ दारूमुक्त व्हावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यात राज्यात दारूमुक्तीसाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. दारूमुक्त महाराष्टÑसाठी पदयात्रेत दहा लाख महिला सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समानतेसाठी मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. कन्यारत्न जन्मोत्सव साजरा करावा. मुलगी जन्माला आली तर पेढे वाटून स्वागत करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकºयांची कर्जमाफी झाली पाहिजे. दिवाळीच्या आत शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झाले तरच कर्जमाफीला अर्थ प्राप्त होईल. यावेळी अमोल अहिरराव यांच्या निर्भया चित्रपटाच्या पोस्टर्सचे प्रकाशन तृप्ती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनोद चव्हाण, विजयालक्ष्मी अहिरे, डॉ. भरत वाघ, डॉ. संदीप पाटील, भारती सूर्यवंशी, गतिांजली बाफणा, संतोष ब्राम्हणे, फिरोज शेख, सागर कचरे आदि उपस्थित होते.

Web Title: Taiagiri Malegaon: Trupti Desai of Bhumata Brigade press conference against women's teasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.