ऑनलाइन रौलेट बिंगोच्या सूत्रधारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:26+5:302021-08-14T04:19:26+5:30
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नाशिक ग्रामीण ...
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ऑनलाइन रोलैट रॅकेटचा नाशिकमधील सुपर डीलर कैलाश शाह याला पुन्हा एकदा पकडण्याची सर्व पुराव्यानिशी तयारी झाली असल्याची माहिती या बैठकीत दिली.
या ऑनलाइन रोलैट जुगारामुळे तरुणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असून, फसवणूक झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आणि गरज पडल्यास कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याविषयी विचार करता येईल, असेही सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर भोईर आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून बैठक घेण्याची विनंती झिरवाळ यांना केली होती.
इन्फो...
सूत्रधारांवर मकोका अंतर्गत कारवाई
नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी येत्या आठवड्यात ऑनलाइन रौलेट जुगाराचा मुख्य सूत्रधार पकडला जाणार असल्याची माहिती दिली आणि येत्या चार महिन्यात या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्यात येईल, अशी ग्वाही देत सर्व आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४२० लागू करतानाच आणि मकोका लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
---
छायाचित्र आर फोटाेवर १३ झिरवाळ मिटींग...