जनतेचे धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 03:57 PM2021-07-01T15:57:57+5:302021-07-01T16:08:25+5:30

मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरु आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करत नाही. जनतेच्या धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करु असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दिला. यावेळी इस्माईल यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले .

Take action against those who plunder the grain of the people | जनतेचे धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा

मालेगावी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धान्य वितरणाचा आढावा घेताना आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल.

googlenewsNext
ठळक मुद्देमुफ्ती मोहंमद : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरु आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करत नाही. जनतेच्या धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करु असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दिला. यावेळी इस्माईल यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
आमदार मुफ्ती मो इस्माईल यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुफ्ती यांनी मे महिन्यात प्रांत शर्मा यांना निवेदन दिले होते व कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुकानदारांना नियमानुसार धान्य वाटपाच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, काही दुकानदारांचा धान्य काळबाजार सुरु असल्याने मुफ्ती यांनी आढावा घेत धान्य वितरण कार्यालयाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.

शासन जनतेला मोफत धान्य देत आहे. तरीही अनेक नागरिकांना मोफतचे धान्य उपलब्ध होत नाही. शहरात १३० रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप केले जाते. १५ हजार अंत्योदय तर २८ हजार बीपीएल कार्डधारक आहेत. शासनाकडून दरमहा या लाभार्थ्यांसाठी धान्य प्राप्त होते. मात्र, त्यांना लाभानुसार धान्य दिले जात नाही.

पिवळ्या शिधापत्रिका धारकांना साखरचे वाटपच होत नाही. धान्याची ऑनलाईन पावती दिली जात नाही. दुकाननिहाय धान्य वाटपाची चौकशी करुन जबाबदार दुकानदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुफ्ती यांनी प्रांत शर्मा यांना दिल्या. बैठकीस प्रभारी धान्य वितरण अधिकारी पी. बी. मोरे, कार्यालय अधीक्षक विजय खरे आदी उपस्थित होते.


 


 

Web Title: Take action against those who plunder the grain of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.