बालभारतीच्या लेखक,प्रकाशकाविरुद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 06:03 PM2019-07-04T18:03:50+5:302019-07-04T18:04:06+5:30

सटाणा : राजपूत करणी सेनेच्यावतीने निवेदन

Take action against the writers and writers of Bal Bharati | बालभारतीच्या लेखक,प्रकाशकाविरुद्ध कारवाई करा

बालभारतीच्या लेखक,प्रकाशकाविरुद्ध कारवाई करा

Next
ठळक मुद्देमहाराणा प्रतापिसंह यांनी देशासाठी संपूर्ण जीवन समिर्पत केले आहे

सटाणा : इयत्ता सातवीच्या ‘बालभारती’ या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करणाऱ्या लेखक व प्रकाशकावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित मजकुराची दुरु स्ती करून महापुरु षांबद्दल आदरपूर्वक लिखाण करावे, अशी मागणी बागलाण तालुका राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फेनिवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराणा प्रतापिसंह यांनी देशासाठी संपूर्ण जीवन समिर्पत केले आहे. स्वाभिमानाने जगणा-या महाराजांबद्दल इयत्ता सातवीच्या नागरिकशास्त्र पुस्तकातील पान क्र मांक पाच व सहावर ‘शिवपूर्वकालीन भारत’ या धडयात लेखकाने महाराणा प्रतापिसंह यांच्याबद्दल एकेरी भाषेचा वापर करून त्यांचा अपमान केलेला आहे. यामुळे राजपूत हिंदू समाजातील सर्व समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्य शासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन या पाठ्यपुस्तकातील मजकूराची दुरु स्ती करावी तसेच महापुरु षांबद्दल एकेरी भाषा वापरणा-या लेखक व प्रकाशकांवर योग्य ती कारवाई करावी तसेच त्यांनी समाजबांधवांची जाहीर माफी देखील मागावी. तसे न झाल्यास श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे महासचिव राजेंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पवार, तालुकाध्यक्ष कल्याणसिंग वाघ, जिल्हा उपाध्यक्ष नंदू पवार, प्रदेश युवा प्रवक्ता राजेंद्र सावकार, युवा तालुकाध्यक्ष सूरज जाधव, बिंदूशेठ शर्मा, चंद्रसिंग सोळंके, नीलेश पाकळे,दीपक ठोके, सुभाष ठोके, अशोक पवार, किरण पवार,चैतन्य ठोके, सागर ठोके आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against the writers and writers of Bal Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक