लोहोणेरला अवैध हातभट्ट्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:40 PM2018-11-24T17:40:38+5:302018-11-24T17:41:17+5:30
लोहोणेर : गावालगत गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोहोणेर : गावालगत गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोहोणेर गावालगत वाहणाºया गिरणा नदीपात्रात बाभूळवनात अवैध दारू भट्ट्या सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापे घातले. ३२५०० रुपयांची दारू व ४८५०० रुपयांचे दारूसाठी लागणारे रसायन व साहित्य असा एकूण ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यासंदर्भात फरार असलेल्या कैलास राजाराम वाघ व सुनील काशीनाथ पवार यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम घुगे, हवालदार भगवान निकम, नामदेव खैरनार, जगताप, नंदू काळे, विशाल आव्हाड, कुणाल मोरे, पवार, चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. लोहोणेर गिरणापात्रात सदर कारवाई होण्याची ही तिसरी वेळ असून, आतापर्यंत लाखो रु पयांचा मुद्देमाल हाती लागला आहे.