स्वाइन फ्लूूबाबत उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:32 AM2017-09-03T00:32:29+5:302017-09-03T00:32:42+5:30
राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे मृत्यू नाशिकला झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
नाशिक : राज्यात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे मृत्यू नाशिकला झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्णात जोमाने पसरलेल्या स्वाइन फ्लू रोगाबाबत आढावा घेताना नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूबाबत जनजागृती व दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दोन महिन्यांपूर्वी स्वाइन फ्लू संदर्भात आपण आढावा घेतला असता त्यात स्वाइन फ्लूची आवश्यक ती लस व औषधे उपलब्ध असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. मात्र आज औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही बाब गंभीर असून, शहरासह ग्रामीण भागात स्वाइन फ्लू प्रतिबंधक आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तत्पूर्वी भाजपाच्या वसंत स्मृती या पक्ष कार्यालयात त्यांनी पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाºयांची बैठक घेऊन मीरा भार्इंदर येथे झालेल्या प्रदेश बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. तसेच आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.