संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:21 PM2020-04-01T23:21:08+5:302020-04-01T23:21:52+5:30

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

Take action on those who violate the ban | संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा

सटाणा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासह इतर विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी विजय भांगरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, तहसीलदार जितेंद्र इंगळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, डॉ. शेषराव पाटील आदी.

Next
ठळक मुद्देसटाणा : कोरोनासंदर्भात लोकप्रतिनिधींची आढावा बैठक

सटाणा : कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
बैठकीत गोरगरिबांची अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाने देशात संचारबंदी लागू केली आहे. पोलिसांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत जमावबंदीचे उल्लंघन करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाºयांना देण्यात आल्या.
बागलाण तालुक्यात बाहेरील देशातून व परप्रांतातून आलेल्या नागरिकांची सखोल माहिती घेत कोरोनावर मात करण्यासाठी खासदार निधीतून पाच लाख व आमदार बोरसे यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकूण दहा लाख रु पयांच्या
निधीची तरतूद करीत असल्याचेही जाहीर केले.
बैठकीला आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बांगर, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सटाणा पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन असताना सर्वसामान्य लोकांना याचे गांभीर्य नाही ही चिंतेची बाब आहे. आरोग्यसेवेच्या बाबतीत जगात दुसºया क्र मांकावर असलेल्या इटलीमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झालेला असताना आरोग्यसेवेत जगात ११२ व्या क्र मांकावर असलेल्या भारतात कोरोना तिसºया टप्प्यात पोहोचला तर भारताची अवस्था काय होईल? याचा विचार करण्याची गरज आहे. कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धावर विजय मिळविण्यासाठी स्वत:च्या घरालाच किल्ला समजून प्रत्येकाने घरीच थांबून कोरोनावर मात करावी.
- डॉ. सुभाष भामरे, खासदार

कोरोना विषाणूची झळ सर्वांनाच बसत असली तरी त्याचा सर्वाधिक फटका गोरगरीब मजुरांना बसलेला आहे. बागलाण तालुक्यातील अनेक मजूर ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत. अनेकांनी मला स्वत: फोन करून मदतीची याचना केली. ज्या त्या भागातल्या आमदारांना फोन करून अशा मजुरांची अन्नपाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. बागलाण तालुक्यातील मजुरांची परिस्थिती अत्यंत वाईट असून, अंतापूर परिसरात बहुतांशी मजुरांनी अन्नच उपलब्ध नसल्याने मोसम नदीमध्ये मासेमारी सुरू आहे.

- दिलीप बोरसे, आमदार

Web Title: Take action on those who violate the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.