कामगार कल्याण योजनांचा लाभ घ्यावा : सतीश दाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:03 AM2018-09-18T01:03:15+5:302018-09-18T01:03:30+5:30

कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा कामगार, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी केले.

Take advantage of Labor Welfare Schemes: Satish Dabhade | कामगार कल्याण योजनांचा लाभ घ्यावा : सतीश दाभाडे

कामगार कल्याण योजनांचा लाभ घ्यावा : सतीश दाभाडे

Next

एकलहरे : कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा कामगार, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी केले.  कामगार मनोरंजन केंद्रात मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कामगार मनोरंजन केंद्राच्या वतीने निखारे यांच्या सत्काराप्रसंगी दाभाडे म्हणाले की, कामगार मंडळातर्फे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, वाचनालय, ग्रंथालय, नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, शिवणवर्ग, शिशुवर्ग आदींचे आयोजन केले जाते. तसेच विविध स्पर्धा व योजना राबविल्या जातात याचा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दाभाडे यांनी केले.  अध्यक्षस्थानी सोलर एनर्जीचे मुख्य अभियंता एन. एम. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त घनश्याम कुळमेथे, उपमुख्य अभियंता देवेंद्र माशाळकर, कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एन.एम. शिंदे, देवेंद्र माशाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, दिनकर खर्जुल, विलास गोडसे यांनी कामगार कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक योगेश कापडणीस यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण अरखराव व आभार सारंग येवले यांनी मानले. यावेळी चेतन वायदंडे, शशिकांत कुमावत, तुकाराम गावित, भानुदास विंचू, प्रशांत आढाव, सतीश सोनवणे, रोहिणी वंजे, अश्विनी लिंबे, लीना पाटील, राजेश परदेशी, भरत बोरसे आदी उपस्थित होते.

Web Title: Take advantage of Labor Welfare Schemes: Satish Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक