ही घ्या काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:27+5:302021-08-21T04:18:27+5:30
ही घ्या काळजी घराला जाळीच्या खिडक्या बसवा. लहान मुलांना संध्याकाळी बाहेर नेऊ नका. अंधार झाल्यावर दारे, खिडक्या बंद करा. ...
ही घ्या काळजी
घराला जाळीच्या खिडक्या बसवा. लहान मुलांना संध्याकाळी बाहेर नेऊ नका. अंधार झाल्यावर दारे, खिडक्या बंद करा. घर अधिकाधिक कोरडे राहील याची काळजी घ्या. घरात कुंड्या तसेच फ्रीजच्या मागे पाणी साचू देऊ नका. इमारतीमधील, गच्चीवरील पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा. पाय आणि हात झाकले जातील असेच कपडे मुलांना वापरा. झोपताना मच्छरदाणी वापरा. बाळ झोपल्यानंतर त्यावर जाळी झाकावी. शाळकरी मुलांना हाता-पायाला निलगिरी तेल लावावे तसेच कपड्यांवर निलगिरी तेल शिंपडल्यास डास चावण्याची शक्यता कमी होते.
डेंग्यूची लक्षणे
प्रचंड जोराचा ताप चढून डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखतो, डोळ्यांच्या मागील भागात वेदना होऊन त्या वाढत जातात, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना वाढतात, जिभेची चव जाऊन भूक नष्ट होते, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येऊन मळमळ आणि उलट्यांचाही काहींना त्रास होतो. तर काहींना दिवसातून दोन वेळा तापात चढ-उतार होतो. हाडापर्यंत वेदना जाणवतात, सांधे दुखतात, अंथरुणातच झोपून राहावे वाटते, गळून गेल्यासारखे वाटते तसेच मळमळ, थोडी पोटदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे जाणवतात.
बालराेग तज्ज्ञ म्हणतात-
शहरात मुलांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुन्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बाळांची आणि मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच थोडा ताप असला तरी घरच्याघरी उपचार करण्यात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यकता भासल्यास तपासण्या करून घेण्याची गरज आहे.
डॉ. सुयश नाईक, बालरोग तज्ज्ञ