अंगणवाडी कर्मचाºयांची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:34 AM2018-02-22T01:34:24+5:302018-02-22T01:34:41+5:30

जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाºयांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

 Take care of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाºयांची धरणे

अंगणवाडी कर्मचाºयांची धरणे

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाºयांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.  एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. जून २०१७ पासून त्यांचे मानधन हे थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. मात्र जिल्ह्यातील सुमारे पाचशेच्या वर अंगणवाडी कर्मचाºयांना गेल्या सात महिन्यांपासून त्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. अनेक कर्मचाºयांचे आधार कार्ड या खात्याशी संलग्न करूनदेखील मानधनाची रक्कम खात्यावर वर्ग होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या प्रश्नावर अधिकाºयांना निवेदने देऊनही त्यावर कोणतीही चर्चा केलेली नाही. वारंवार आश्वासन देण्यात आल्यामुळे अखेर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजश्री पानसरे, पद्मा भुजबळ, भारती कुलकर्णी, रजनी कुलकर्णी आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.  दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि संघटना पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Web Title:  Take care of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.