डॉक्टरांच्या सेवेची दखल घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:19 AM2017-08-04T00:19:26+5:302017-08-04T00:20:40+5:30
नाशिक : ग्रामीण तसेच आदिवासी भागात सेवा देणाºया डॉक्टरांचे काम कौतुकास्पद असून, त्यांच्या या कार्याची दखल घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि. ३) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यक्त केले.

डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या पुरस्कार सोहळ्यात शहरातील डॉक्टरांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. रमाकांत पाटील, डॉ. श्रीनिवास गोकूलनाथ, डॉ. अरुणा वानखेडे, डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. किशोर वाणी, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. मंगेश जाधव, डॉ. अनिता कुलकर्णी, डॉ. प्राची पवार, डॉ. अभिषेक पिंप्राळेकर, डॉ. साधना पवार या पुरस्कार प्राप्त डॉक्टरांचा समावेश होता. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे यांनी डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या स्मृतीला उजाळा दिला. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याची पार्श्वभूमी आणि पुरस्कार निर्मिती प्रक्रि येची यावेळी माहिती दिली तसेच पुरस्कार निवड समितीतील डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या २९२ प्रस्तावातून या अकरा डॉक्टरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, शंकरराव बर्वे, सकाळचे संपादक श्रीमंत माने, डॉ. कुणाल गुप्ते, डॉ. नीलिमा पवार, भक्तिचरणदास महाराज, सविदानंद सरस्वती उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत मधुकर झेंडे, सूत्रसंचालन स्वप्नील तोरणे, तर आभार गणेश बर्वे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.