‘पतंग उडविताना काळजी घ्यावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:19 AM2019-01-13T00:19:58+5:302019-01-13T00:20:43+5:30
मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
नाशिकरोड : मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
अपघातविरहित पतंग उत्सवासाठी पतंगप्रेमींनी विद्युत सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, वीज तारा असलेल्या परिसराऐवजी मोकळ्या मैदानात पतंग उडवावी, वीजेच्या तारांवर, खांबावर अडकलेली पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये, तारांवर अडकलेली पतंग काढताना, मांजा ओढताना वीज तारांचे एकमेंकावर घर्षण होऊन शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानी होऊ शकते. मोकळ्या मैदानातच पतंग उडविण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.