आरोग्य सांभाळा! स्वच्छतेचा असेल अभाव; त्या घरात आजारांना वाव; 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:10 PM2022-07-06T18:10:01+5:302022-07-06T18:14:13+5:30

नाशिक : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील पिण्याचे पाणी तर शुद्धच लागते. त्याचबरोबर घराच्या आसपास ...

Take care of your health! Lack of hygiene; Sickness in that house | आरोग्य सांभाळा! स्वच्छतेचा असेल अभाव; त्या घरात आजारांना वाव; 'अशी' घ्या काळजी

आरोग्य सांभाळा! स्वच्छतेचा असेल अभाव; त्या घरात आजारांना वाव; 'अशी' घ्या काळजी

Next

नाशिक : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील पिण्याचे पाणी तर शुद्धच लागते. त्याचबरोबर घराच्या आसपास पाणी साचू न देण्याची दक्षता देखील घ्यावी लागते. अन्यथा त्या घरातील कुटुंबाला सातत्याने आजारांचा सामना करण्याची वेळ येते.

पाणी साचल्याने रोगराई

पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेसोबत अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये यासाठी स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. आपल्या राहत्या परिसरात कचरा व पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. प्रकाशाची कमतरता असल्याने वातावरणातील जीवजंतूंचा नायनाट होत नाही. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची निर्मिती होणार नाही, रोगराईला आळा बसेल.

जलजन्य आजारांची भीती

पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाचा फैलावही अधिक होतो.

कचरा साचणे धोकादायक

पाण्याच्या शुद्धतेसोबत अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये, यासाठी स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. आपल्या राहत्या परिसरात कचरा व पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. प्रकाशाची कमतरता असल्याने वातावरणातील जीवजंतूंचा नायनाट होत नाही. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची निर्मिती होणार नाही, रोगराईला आळा बसेल.

पाणी साठल्यास आजारांना निमंत्रण

घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील तर पावसापूर्वी त्याची छाटणी करावी, घरामध्ये झाडे लावू नयेत. त्यात पाणी साचून डासांची पैदास वाढते. घरात डोअरमॅटमध्येही पाणी राहिल्यास त्यातही डासांची पैदास होण्याची शक्यता असते. पिंपामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये साठवणूक केलेले पाणी एका दिवसापेक्षा अधिक साठवून ठेवू नये. या हवेत वाढणारे जीवाणू- विषाणू- कीटक- बुरशी यामुळे अनेक रोगांची साथ पसरुन आजारांना निमंत्रण देतात.

 

Web Title: Take care of your health! Lack of hygiene; Sickness in that house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.