ज्येष्ठांना सांभाळा; मध्यमवयीनांनी काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:22 AM2020-12-05T04:22:20+5:302020-12-05T04:22:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात गत आठ महिन्यांत सर्वाधिक मृत्यू हे ६० वर्षांवरील नागरिकांचे झाले असून, या वयोगटातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात गत आठ महिन्यांत सर्वाधिक मृत्यू हे ६० वर्षांवरील नागरिकांचे झाले असून, या वयोगटातील मृतांचा आकडा एक हजारकडे सरकत आहे, तर कोरोनाबाधित ४१ते ६० या मध्यमवयीन वयोगटातील मृतांची संख्या ६८४ वर पोहोचली असून, या वयोगटातील नागरिकांनीदेखील स्वत:च्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज त्यामुळे अधोरेखित झाली आहे.
कोरोनाच्या प्रसारानंतर जिल्ह्यातील बळींची संख्या वाढत जात आता थेट अठराशेवर पोहोचली आहे. त्यातही ६० वर्षांवरील वयोगटातील मृतांची संख्या ९७८ वर पोहोचली असून, ही संख्या एकूण मृतांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांची सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे, तर मध्यमवयीन नागरिक त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांच्यासाठी तर एकीकडे कार्यरत राहून कुटुंबाचे पालनपोषण करणे तसेच स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्याची दुहेरी जबाबदारी आलेली आहे.
इन्फो
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण - १,०१,८२२
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ९६,९९६
सध्या उपचार घेणारे रुग्ण - ३०२२
इन्फो
वयोगट बाधित रुग्ण एकूण मृत्यू
० ते १२- ५५७६- ०१
१३ ते २५ - १५,०७०- १९
२६ ते ४०-३३,९५३- १३१
४१ ते ६०- ३३,७९७ - ६८४
६१वर्षांवरील १३,७२८ ९७८
इन्फो
नाशिक शहरात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यातील शहरी भागात अधिक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या १८०४ मृत्यूंपैकी नाशिक महापालिका क्षेत्रात निम्म्याहून अधिक म्हणजेच ९१० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर मालेगाव मनपा क्षेत्रात १७१ नागरिकांचा बळी गेला आहे. त्याशिवाय नाशिक ग्रामीणमधून ६८०, तर जिल्हाबाह्य ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इन्फो
सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आढळून आली. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात तब्बल ३७२ मृत्यू तर सप्टेंबर महिन्यात ४९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या वाढ तसेच मृत्युदरातही घट आली आहे.