दुचाकीची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा न्याहाळदे : पोलीस ठाण्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:16 AM2018-02-28T01:16:39+5:302018-02-28T01:16:39+5:30
इंदिरानगर : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करताना आणि वाहनांवर क्रमांक टाकताना मूळ कागदपत्रे व ओळखपत्र पाहूनच व्यवहार करावा़ अन्यथा संबंधित व्यक्तीस वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल.
इंदिरानगर : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करताना आणि वाहनांवर क्रमांक टाकताना मूळ कागदपत्रे व ओळखपत्र पाहूनच व्यवहार करावा़ अन्यथा संबंधित व्यक्तीस वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी केले़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात वाहनांवर क्रमांक टाकणारे आणि खरेदी-विक्री करणाºया व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते़ न्याहाळदे यांनी सांगितले की, शहरात दिवसेंदिवस वाहनचोरीचे प्रकार वाढत आहेत़ वाहन विक्रीसाठी चोरटे वेगवेगळे बहाणे देतात़ तसेच वाहन क्रमांक, चेसी क्रमांक व इंजिनच्या क्रमांकासोबत छेडछाड करतात, प्रसंगी आर्थिक चणचण असल्याचा आव आणून कमी किमतीत वाहनाची विक्री करतात़ त्यामुळे वाहनावरील क्रमांक टाकताना मूळ कागदपत्रे, आधार कार्ड पाहूनच व्यवहार करावेत़ तसेच रजिस्टरवर नोंद करून दर महिन्याच्या अखेरीस पोलीस ठाण्यात सादर करावेत़ या कायद्याचे काटेकोरपणे पालन न करणाºया व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे न्याहाळदे म्हणाले़ या बैठकीस इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वाहन खरेदी-विक्री करणारे तसेच वाहनांवर क्रमांक टाकणारे व्यावसायिक उपस्थित होते़