निफाड येथे न्या. रानडे यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 07:16 PM2021-01-18T19:16:42+5:302021-01-18T19:17:39+5:30
निफाड : येथे थोर समाजसुधारक न्या रानडे यांची जयंती सोमवारी (दि.१८) वैनतेय विद्यालयात साजरी करण्यात आली.
निफाड : येथे थोर समाजसुधारक न्या रानडे यांची जयंती सोमवारी (दि.१८) वैनतेय विद्यालयात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त राजेंद्र राठी होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, मुख्याध्यापक सुजाता तनपुरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप, मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डी. बी. वाघ यांनी केले. गणेश कुयटे यांनी न्या. रानडे यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली. राजेंद्र राठी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांनी केले.
श्री माणकेश्वर वाचनालयात पिंपळगाव बसवंतचे उपसरपंच सुहास मोरे व निफाडचे माजी नगरसेवक अनिल कुंदे यांच्या हस्ते न्या. रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र सोमवंशी यांनी केले. याप्रसंगी ॲड.प्रवीण ठाकरे, तनवीर राजे, दत्ता उगावकर, सुनील चिखले, संतोष कुंदे, नईमखान पठाण, सुजाता तनपुरे, मेघा जंगम, राहुल नागरे, एस. एम. सोनवणे, पुंजा तासकर, सुनील निकाळे, राजेश लोखंडे, बाळा खडताळे, बाळासाहेब खालकर, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.