नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी जनतेला कोव्हीड पासून वाचवा ; किरीट सोमैय्यांची घनाघाती टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:03 PM2021-03-22T16:03:10+5:302021-03-22T16:04:25+5:30

नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच शरद पवारांनाही टिकेचे लक्ष केले. गृहमंत्री अनील देशमुख यांच्याकडून पोलीस खात्यामार्फत होणाऱ्या शंभर कोटींच्या वसुलीचा काही भाग राष्ट्रवादी पक्षालाही मिळत असण्याची शक्यता व्यक्त केली.

Take the note counting machine later, save the masses from covid first; Somaiya's harsh criticism of the state government | नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी जनतेला कोव्हीड पासून वाचवा ; किरीट सोमैय्यांची घनाघाती टिका

नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी जनतेला कोव्हीड पासून वाचवा ; किरीट सोमैय्यांची घनाघाती टिका

Next

नाशिक : नोटा मोजण्याचे मशीन नंतर घ्या, आधी महाराष्ट्राच्या जनतेला कोव्हीड पासून वाचवा असे खोचक टोला लगावत भाजापा नेते किरीट सोमैय्या यांनी राज्यातील सरकारवर राज्यातील वाढतील कोरोना परिस्थिती आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२२) घनाघाती टिका केली. 

किरिट सोमय्या सोमवारी नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेलाही टिकेचे लक्ष केले. गृहमंत्री अनील देशमुख यांच्याकडून पोलीस खात्यामार्फत होणाऱ्या शंभर कोटींच्या वसुलीचा काही भाग राष्ट्रवादी पक्षालाही मिळत असण्याची शक्यता व्यक्त केली. त्याचप्रमाणे गृहमंत्री अनील देशमुख परमवीर सिंग यांच्यावर आरोप करीत असताना दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांची स्तूती करतानाच ते प्रमाणिक अधिकारी असल्याचे म्हटले जात असल्याचे नमूद करतानाच परमवीर सिंग काय आहे आधी हे ठरवा, परमवीर सिंग जर चांगले आहे तर गृहमंत्री का हटवत नाहीत, जर गृहमंत्री योग्य तर परमवीर ला का हटवत नाहीत अशा सवालही किरीट सोम्मया यांनी केला. दरम्यान, भाजपाच्या सत्ताकाळआत असतानाही सचीन वाझे याला पुन्हा कार्यरत करण्यासाठी प्रयत्न झाले. दोन मंत्री नेहमी फॉलोअप घेत होते असा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहखाते व गृहनिर्माण खाते दोन्ही शिवसेनेचे नेतेच चालवतात. त्यामुळे वाझे यांनी वसुलीच्या पैशातून घेतलेल्या महागड्या गाड्या कोणी वापरल्या याविषयी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी किरिट सोमय्यांनी केली. सचिन वाजेचा १२ महिन्याचे वसुली कारभाराची चौकशी एनआयएसोबतच अंमलवजावणी संचानालय (ईडी), आयकर विभाग व कंपनी मंत्रालयानेही करावी अशी मागणी किरिट सोमय्या यांनी केली. दरम्यान, सरकारमधील मंत्र्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसेल तर परमवीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची हिम्मत सरकार का दाखवत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

कोविड नियंत्रणात सरकारला अपयश 

राज्यात गेल्या दहा दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारला कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टिका किरीट सोमय्या यांनी केली. राज्यातील १५ जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्रकल्प निर्मीतीसाठी निविदा काढून त्यांचे कार्यादेश झाल्यानंतरही जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी हे प्रकल्प कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाची गैरसोय होत असून राज्यार कोरोनाचा फैलाव होत असून राज्य सरकारने वसुली विभागावर लक्ष केंद्रीत केल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता आगामी काही दिवसात पुन्हा ऑक्सिजनची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करतानाच राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र राज्य सरकार लसीकरणाविषयी उदासीन असल्याचे सांगतानाच केद्र सरकारने राज्याला १५ लाख लस पुरवठा केला असून अद्याप राज्यात केवळ ७ लाख लसीकरण झाले असल्याचे सांगतानाच राज्य सरकार लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी लसनिर्मितीची परवानगी मागत असल्याकड़ेही किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधले.

Web Title: Take the note counting machine later, save the masses from covid first; Somaiya's harsh criticism of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.