वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:17 PM2018-08-20T16:17:28+5:302018-08-20T16:23:36+5:30

Take preventive action against the hostel site; Maratha Kranti Front | वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा

वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा

Next
ठळक मुद्देवसतीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर कारवाई करामराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसमाजाला डिवचण्यासाठी जागेला विरोध, मराठा मोर्चाचा आरोप

नाशिक :मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले.  वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच जिल्हाभरासह संपूर्ण शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनादरम्यान  आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश येत असताना काही समाजविघातक प्रवृत्ती विरोधाची भूमिका घेऊन शांततेच्या मानिसकतेत असलेल्या मराठा समाजाच्या सहनशक्तीला आव्हान देत सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीच असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केला आहे. अशा नाठाळ प्रवत्ती जाणीवपुर्वक मराठा समाजाच्या अस्मितेला डिवचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कुटीलपणा करीत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठा समाजाला अथक प्रयत्नांनतर मिळालेले वस्तीगृह हिरावून घेण्याचा यामागे डाव खेळला जात असल्याचे वस्तीगृहाच्या जागेला होत असल्याच्या विरोधातून समोर येत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गंगापूर रोडवरील भुखंड मंजूर केला आहे. ही बाब सहन न झालेल्या काही प्रवृत्तींनी या जागेवर वस्तीगृह बांधण्यास विरोध दर्शविला आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या समाज विघातक प्रवृत्तींचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करून वस्तीगृह बांधकामाला गती द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, विलास जाधव,संदीप लभडे,मदन गाडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अनुपमा पाटील, ज्ञानेश्वर जाधव,ज्ञानेश्वर भोसले,अ‍ॅड. निलेश संधान,विकास काळे,आप्पासाहेब गाडे,निलेश पाटील आदी उपिस्तत होते.  

Web Title: Take preventive action against the hostel site; Maratha Kranti Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.