नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:27 PM2020-10-03T23:27:21+5:302020-10-04T01:16:51+5:30
येवला : नागरिकांमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्स बाबत जनजागृती करण्यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
येवला : नागरिकांमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्स बाबत जनजागृती करण्यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
कोरोना व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, तालुक्याला मिळालेले सर्व व्हेंटिलेटर्स सुरू करण्यात यावेत. ते सुरू झाल्यानंतर त्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व आवश्यक कर्मचाºयांची नेमणूक करण्यात यावी. येवला उपजिल्हा रु ग्णालयातील आॅक्सिजन लाईनसह राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करून तातडीने सुरू करण्यात यावेत. आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबतचा आढावा घेत त्यासाठी मुदत वाढीबाबत आदेश भुजबळ यांच्याकडून देण्यात आलेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या, तसेच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाºया सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याच्याही सूचना भुजबळ यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.