आरोग्य विभागाची लेखी परीक्षा पुन्हा घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:37+5:302021-03-06T04:13:37+5:30
राज्यभरात परीक्षा होत असतांना स्थानिक प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे ...
राज्यभरात परीक्षा होत असतांना स्थानिक प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील ढिसाळ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. औरंगाबादमध्ये फोनद्वारे उत्तर सांगणारे रॅकेट पकडण्यासह डमी उमेदवार बसविणे, कोरोना संसर्ग काळात परीक्षा केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवता एका बेंचवर दोन उमेदवार बसविणे, बेंचवर परीक्षा क्रमांक नसणे असे प्रकार नाशिक, रत्नागिरी, नागपूर, नगर यासह इतर जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. परीक्षा केंद्र परीक्षा वेळेत न उघडणे, परीक्षा केंद्रावर पुरेसे पोलीस संरक्षण नसणे, प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा परीक्षार्थींना देणे असे प्रकार या परीक्षा काळात घडले आहेत. सदर प्रकारची सखोल चौकशी करून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली परीक्षा तथा परीक्षा उमेदवार निवड प्रक्रिया त्वरित रद्द करून आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी अध्यापक भारतीचे शरद शेजवळ यांनी केली आहे.