विमानसेवेचे १५ डिसेंबरपासून टेकआॅफ शासनाचे आश्वासन : हेमंत गोडसे यांचे दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:11 AM2017-10-27T01:11:36+5:302017-10-27T01:11:43+5:30

नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला.

Takeawaf government's assurance from the airline on December 15: Hemant Godse's movement in Delhi | विमानसेवेचे १५ डिसेंबरपासून टेकआॅफ शासनाचे आश्वासन : हेमंत गोडसे यांचे दिल्लीत आंदोलन

विमानसेवेचे १५ डिसेंबरपासून टेकआॅफ शासनाचे आश्वासन : हेमंत गोडसे यांचे दिल्लीत आंदोलन

Next

नाशिक : नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला. सदर मोर्चा खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेत टाइम स्लॉटला मान्यता देत १५ डिसेंबरच्या आत विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र नागरी उड्डाण मंत्रालयाने शिष्टमंडळाला दिले. केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली. छोट-छोटी विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडणे हा हेतू या योजनेमागे आहे. या योजनेंतर्गत नाशिकसह राज्यातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी सतत पाठपुरावा करूनही जी.व्ही.के. कंपनीने राज्यातील विमानतळांना मुंबईत टाइम स्लॉट नसल्याचे स्पष्ट करत सुरू होणाºया विमानसेवेला खीळ घातली. मात्र गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर येथील विमानतळांना आॅगस्ट महिन्यात टाइम स्लॉट उपलब्ध करून दिला. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी थेट दिल्ली येथील नागरी वाहतूक मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चा मंत्रालयावर येताच आंदोलकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यपद्धतीचा निषेध केला. मोर्चात खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष निरज शेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्ला, सेनेचे पंजाब प्रदेशाध्यक्ष योगीराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
नागरी वाहतूक मंत्रालयाकडून वेळेची मान्यता
आंदोलनानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या शिष्टमंडळाने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी शासन आणि जी.व्ही.के. कंपनीकडून राज्याच्या विमानसेवेवर झालेल्या अन्यायाबाबत हेमंत गोडसे यांनी अधिकाºयांना माहिती दिली. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन टाइम स्लॉटला मान्यता देत काहीही झाले तरी १५ डिसेंबरच्या आत नाशिकची विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र अधिकाºयांनी दिले. यावेळी नागरी वाहतूक मंत्रालयाचे उषा पाधी, रु बीना अलीम, जी. के. चोखीयाल, उमेश भारद्वाज, अनुप पंथ आदी अधिकारी उपस्थित होते. नागरी वाहतूक मंत्रालयाने लेखी हमीपत्र दिल्यावर आनंदलेल्या शिवसैनिकांनी मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला.
 

Web Title: Takeawaf government's assurance from the airline on December 15: Hemant Godse's movement in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.