टाकेदला होणार ५० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 00:19 IST2021-04-24T21:06:26+5:302021-04-25T00:19:42+5:30
सर्वतीर्थ टाकेद : येथील ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून टाकेद येथे लवकरच कोविड सेंटर सुरू होणार असल्याने शनिवारी (दि. २४) आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी निवासी वसतिगृहाची इमारत स्वच्छ करण्यात आली.

टाकेदला होणार ५० बेडचे कोविड सेंटर
सर्वतीर्थ टाकेद : येथील ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून टाकेद येथे लवकरच कोविड सेंटर सुरू होणार असल्याने शनिवारी (दि. २४) आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी निवासी वसतिगृहाची इमारत स्वच्छ करण्यात आली.
परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी (दि. २३) प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी वर्गासह टाकेद येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी निवासी वसतिगृहाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कमीत कमी दिवसांत कोविड सेंटर रुग्णाच्या सेवेत कसे उभारले जाईल यासाठी कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता, सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदी उपस्थित होते.