टाकेदला हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:29 PM2020-01-18T22:29:15+5:302020-01-19T01:10:56+5:30
सर्वतीर्थ टाकेद येथे आयोजित केलेल्या ५१व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात रथ मिरवणूक काढली.
सर्वतीर्थ टाकेद : येथे आयोजित केलेल्या ५१व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात रथ मिरवणूक काढली. संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली. गावातील प्रेमनगर गल्ली, शनिमंदिर चौक, इंदिरानगर, तेली गल्ली, धादवड गल्ली, परदेशी गल्ली ते मुख्य मारुती मंदिर चौक आदी परिसरातून दिंडी काढण्यात आली. टाळमृदंगाच्या गजरात ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात अवघे ग्रामस्थ तल्लीन झाले होते. या दिंडीत गावातील शेकडो महिला पारंपरिक पोशाख परिधान करून डोक्यावर भगवद्गीता घेऊन सहभागी झाल्या होत्या. सप्ताहाच्या मुख्य ठिकाणी शिवाजी चौकात दिंडी आल्यानंतर येथे मोठे रिंगण झाले. यावेळी सरपंच ताराबाई रतन बांबळे, बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदी उपस्थित होते.