कसारा घाटात टँकरची हवा काढून दूध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:38 PM2018-07-16T18:38:07+5:302018-07-16T18:41:50+5:30

दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १६) आक्रमक भूमिका घेत कसारा घाटात दुधाची वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर वाहने अडविण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही कार्यकर्त्यांनी कसारा घाटाच्या परिसरात दुधाच्या टॅँकरची हवा सोडून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 Taking the air of tanker in the Kasara Ghat and trying to stop the transportation of milk | कसारा घाटात टँकरची हवा काढून दूध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न

कसारा घाटात टँकरची हवा काढून दूध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे दुधाच्या रास्त भावासाठी स्वाभिमानीचे आंदोलनदुधाचा टॅंकर अडवून चांकाची हवा सोडलीकसारा घाटात दुधाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न

नाशिक : दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १६) आक्रमक भूमिका घेत कसारा घाटात दुधाची वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह काही कार्यकर्त्यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर वाहने अडविण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही कार्यकर्त्यांनी कसारा घाटाच्या परिसरात दुधाच्या टॅँकरची हवा सोडून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करीत सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली.
नाशिक जिल्ह्यात रविवारी वणी येथे जगदंबेला दुग्धाभिषेक केल्यानंतर सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी मंदिराच्या पहिल्या पायरीवर दुग्धाभिषेक करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. याचवेळी नाशिक शहरात टाळकुटेश्वरालाही दुग्धाभिषेक करून शहरातील कार्यकर्त्यांनी दुधाच्या दरासाठी आंदोलनास प्रारंभ केला. हे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र करण्यात आले आहे. स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, नाशिक जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शहराध्यक्ष नितीन रोठे , सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, युवराज देवरे, सोमनाथ जाधव आदी कार्यकर्त्यांनी कसारा घाटात दुधाचे टॅँकर अडवून त्यांच्या चाकांतील हवा काढून देत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना ताब्यात घेतले. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना गनिमी कावा करून हे आंदोलन करीत असल्याने कसारा घाटासह नाशिक-मुंबई महामार्गावर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी दुधाचे टँकर अडविण्याचे नियोजन स्वाभिमानीकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title:  Taking the air of tanker in the Kasara Ghat and trying to stop the transportation of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.