वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:07 AM2018-08-26T01:07:21+5:302018-08-26T01:08:08+5:30
पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाताळेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या वृृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे करताना आपल्या विद्यालयातील प्रांगणातील प्रत्येक वृक्षास व रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना राखी बांधून ‘वृक्ष वली आम्हा सोयरे वन चरे’, ‘सदा राखू, वृक्ष लावा वृक्ष जगवा, वृक्ष हीच संपत्ती, एक मूल एक झाड, वृक्ष लावा दारी मिळेल छाया भारी, अशी शपथ घेतली. नारळी पौर्णिमा या सणाचे महत्त्व व रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व सविता देशमुख यांनी सांगितले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ºहास होण्याची कारणे सांगून आपण सर्वांनी त्याच्या संवर्धनासाठी धार्मिकतेबरोबर विज्ञानाची जोड देऊन संकल्प केला. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीने एका मुलास राखी बांधून प्रेम, बंधुता, सर्वधर्मसमभाव, स्व-संरक्षण या गुणाची त्याच्याकडे भेट म्हणून मागणी केली व माझ्या रक्षणासाठी तू माझ्या पाठीशी उभे रहावे ही भावना व्यक्त केली. विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी ओम रेवगडे याचे औक्षण करून त्यास सर्व मुलींनी राख्या बांधल्या. आजच्या दिवसाचे औचित्य साधून वृक्षाचा वाढदिवस साजरा करून राखी बांधली. बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंद लोखंडे, संचालक अरूण गरगटे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन अशोक रेवगडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नवनाथ जाधव, उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे हे उपस्थित होते.