जिल्ह्यात तलाठ्यांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:25 AM2017-11-08T01:25:55+5:302017-11-08T01:25:55+5:30
वाळूची गाडी पकडल्याच्या कारणावरून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करणाºया मारेकºयांवर मोक्कान्वये कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठ्यांनी सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही कायम असून, यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान, तलाठ्यास मारहाण करणारे आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नाशिक : वाळूची गाडी पकडल्याच्या कारणावरून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करणाºया मारेकºयांवर मोक्कान्वये कारवाईच्या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठ्यांनी सुरू केलेले लेखणी बंद आंदोलन मंगळवारी दुसºया दिवशीही कायम असून, यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. दरम्यान, तलाठ्यास मारहाण करणारे आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सह्णाद्री हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला होता. यादव विठ्ठल बच्छाव या तलाठ्याने महिनाभरापूर्वी वाळूची गाडी पकडल्याचा राग मनात धरून असलेल्या वाळू माफियांनी सकाळी दुचाकीवरून जाणाºया बच्छाव यास रस्त्यात गाठून लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात बच्छाव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळूमाफियांकडून नेहमीच तलाठी व महसूल अधिकाºयांवर जीवघेणे हल्ले होत असल्याने वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी, अशी मागणी तलाठी संघटनेने करून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी दुसºया दिवशीही आंदोलन सुरूच होते. या संदर्भात दुपारी नाशिक तलाठी कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक होऊन त्यात आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्णातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले असून, पोलिसांनी हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली व त्यानंतर सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवेदनही सादर केले.