सवंदगाव शिवारातील घटनेनंतर तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:03 PM2018-09-06T18:03:52+5:302018-09-06T18:04:31+5:30
मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणानदी पात्रालगत वाळु खाणीतुन अवैध वाळु उपसा करताना ढिगारा कोसळून भावडू रामचंद्र वाघ या मजुराचा मृत्यु झाला होता तर दोन मजुर गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर येथील महसुल विभाग खडबडून जागा झाला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकबाबत निष्काळीपणा, हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सवंदगाव येथील तलाठी एन.एस. पवार यांना प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निलंबीत केले आहे.
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गिरणा नदी पात्रालगत तंबु ठोकून गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ५ ते १५ सप्टेंबर पर्यंतच्या गस्तीचे नियोजन करुन २१ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता केवळ तलाठ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाळु माफियांशी हितसंबंध असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांना महसूलच्याच अधिकाºयांनी मोकळीक दिली आहे. वराती मागुन घोडे नाचविण्याचा महसुलचा प्रकार दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सवंदगाव शिवारातील गिरणानदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जातो. सध्या गिरणा नदीला पाणी असल्याने नदी पात्रालगतच्या खाणीतून वाळू उपसा सुरू होता. सोमवारी अवैधरित्या वाळु उपसा करीत असताना ढिगारा कोसळुन मजुराचा मृत्यु झाला. ग्रामस्थांनी महसुल अधिकाºयांना जबाबदार धरले होते. तर महसुल विभागाने यापूर्वी १९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगून सरवासारव केली होती. वाळुमाफियांकडून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी २४ तासांसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या भागात महसुलचे कर्मचारी दिवस-रात्र गस्त घालणार आहेत. तसेच तंबु ठोकून लक्ष देणार आहे. या कामात हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. एका पथकात मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व एक पोलीस असे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे २१ पथकांची निर्मिती करण्यात आली असून एक पथक १२ तास गस्त घालणार आहे. पथकांना थांबण्यासाठी एक तंबु ठोकण्यात आला आहे. सध्या दहा दिवस गस्तीचे नियोजन करण्यात आले आहे.
गस्तीवर असणाºया अधिकाºयांची रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाणार आहे. या दरम्यानची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे. वाळु चोरट्यांवरील सातत्य ठेवणार असल्याची माहिती महसुलच्या अधिकाºयांनी दिली. तसेच गिरणा व मोसम नदी पात्रातुन अवैध वाळु उपशा करणाºयांवरही धडक कारवाई केली जाणार आहे.