परवानगी न घेता तलाठी स्वित्झर्लंडला; जिल्हा प्रशासनाची निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:41 AM2018-05-17T05:41:53+5:302018-05-17T05:41:53+5:30
कार्यालयाची परवानगी न घेता विदेशात गेल्याच्या कारणावरून तालुक्यातील विहितगाव येथील तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
नाशिक : कार्यालयाची परवानगी न घेता विदेशात गेल्याच्या कारणावरून तालुक्यातील विहितगाव येथील तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. राज्याच्या महसूल सचिवाशी संबंधित व्यक्तीच्या जमीनविषयक नोंदी घेण्यास विलंब केल्याने, मंत्रालयातून आलेल्या दबावातूनच जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
विहितगाव येथील तलाठी रमेश शंकर उगले यांच्या कामकाजाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाºयांना त्यांच्या दप्तराची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अधिकाºयांनी तपासणी केली असता, त्यात गंभीर दोष आढळले, परंतु या संदर्भात उगले यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली असता, त्याचदरम्यान तलाठी उगले हे कुटुंबासह स्वित्झर्लंड येथे गेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
या दौºयासाठी उगले यांनी कार्यालय प्रमुखाची अनुमती न घेतल्याची बाब गंभीर मानली जाऊन दोन दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.