तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव तालुक्यात ६१९ रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 07:12 PM2020-09-20T19:12:24+5:302020-09-20T19:12:24+5:30
दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ६१९ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी दिंडोरी शहरात ९६ व जिल्हा परिषद क्षेत्रात ५२३ असून एकूण ६१९ पैकी ४६६ रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. व १३५ रु ग्ण सध्या सक्र ीय असून आतापर्यंत १८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ६१९ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी दिंडोरी शहरात ९६ व जिल्हा परिषद क्षेत्रात ५२३ असून एकूण ६१९ पैकी ४६६ रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. व १३५ रु ग्ण सध्या सक्र ीय असून आतापर्यंत १८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र बंद राहणार असल्याने या कालावधीत रु ग्णांना जवळच्या उपकेंद्रात औषध उपचार करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी दिली आहे.
दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, राज्यात सध्या कोविड बाधित रु ग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रक, ट्रीट या त्रिसुत्रीचा वापर करु न कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे असुनही महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजारांच्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरामध्ये या आजारांच्या तुलनेत स्थिर होत असली तरी इतर जिल्हे व ग्रामीण भागात कोविड १९ रु ग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत.
कोरोना विषाण च्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सकस आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास या विषाणूपासुन बचावा करीता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी सर्वोतोपरी काळजी घ्यावी व मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद दयावा. असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजीत कोशिरे, ग्रामीण रु ग्णालयाचे अधीक्षक डॉ विलास पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी केले आहे.