चर्चा तर होणारच, लग्नाच्या वरातीत नवरदेवाचं मिशन No CAA, No NRC
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 10:25 PM2020-01-26T22:25:31+5:302020-01-26T22:25:45+5:30
शहरातील हकिम नगर येथील नाझीम बशीर शेख असे नवरदेवाचे नाव आहे.
मालेगाव मध्य (नाशिक) : लग्न सोहळा म्हटलं की हौसमौज, मजामस्ती मनसोक्तपणे व्यक्त करण्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम होय. मात्र, शहरात एक लग्नसोहळा याला अपवाद ठरला आहे. वधु-वर मंडळींनी या सोहळ्याचा मुहुर्त प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केला होता. पण, नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींनी हाती राष्ट्रध्वज घेऊन NRC व CAA विरोधात घोषणाबाजी करत वरात काढली.
शहरातील हकिम नगर येथील नाझीम बशीर शेख असे नवरदेवाचे नाव आहे. हकिम नगर येथून आज नाझीम यांच्या लग्नाची वरात निघाली. नवरदेवाने वरमाला हाती घेऊन NO NRC, NO CAAचा फलक घेत मंडपाबाहेर धाव घेतली. मग वऱ्हाडी मंडळींनीही हातात राष्ट्रध्वज घेऊन घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या लग्न सोहळ्यात एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, जनता दलाचे सचिव नगरसेवक मोहम्मद मुस्तकिम डिग्नीटी महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग सहभागी झाले होते. यावेळी सुलेमानी चौक येथे दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या नियोजित कार्यक्रमानुसार वऱ्हाडी मंडळींना मुस्तकिम डिग्नीटी यांनी संविधान प्रस्तावनाची शपथ दिली. त्यामुळे नाझीम शेख यांचा विवाहसोहळा शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून सगळीकडे या विवाहाचीच चर्चा आहे.