सर्वोच्च कळसुबाई शिखरावर युवकांनी उभारली उंच गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:49 PM2019-04-06T18:49:38+5:302019-04-06T18:50:45+5:30
घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला.
घोटी : राज्यातील सर्वोच्च असणाऱ्या कळसूबाई शिखरावर शनिवारी सकाळी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने नव्या वर्षाची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले. अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या गिर्यारोहक युवकांनी यावेळी मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला. लोकशाही व्यवस्था बळकट होण्यासाठी जास्तीतजास्त मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार वापरण्याचा संकल्प नागरिकांकडून करून घेण्यात आला. नववर्षाच्या प्रारंभी पहाटेच शिखरावर जावून गुढी उभारल्यानंतर तरु णांनी मतदान जनजागृतीचा संकल्प केला. यावेळी उगवत्या सूर्याचे शिखरावरच दर्शन घेऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
घोटी येथील युवक नवरात्रीत तर दररोज उपाशीपोटी कळसुबाईच्या शिखरावर जातात. वर्षभरात अनेक उपक्र मांच्या माध्यमातून हे युवक नेहमीच शिखरावर जाऊन खऱ्या निसर्गाचा आनंद घेतात. सद्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला अनमोल असणारा मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही व्यवस्था सक्षम करावी यासाठी उपक्र म राबवण्यात आला.
कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गिर्यारोहक भगीरथ मराडे, काळू भोर, पंढरीनाथ दुर्गुडे, अशोक हेमके, प्रविण भटाटे, निलेश पवार, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, उमेश दिवाकर, निलेश आंबेकर, ज्ञानेश्वर मांडे, संदीप परदेशी, सोमनाथ भगत, किसन दराणे, गोरख डगळे, कैलास धिंदळे, बाळू मधे, जालिंदर घाणे, पारधी सर, पांडुरंग तातळे आदी यामध्ये सहभागी झाले होते.
देवी दर्शनाची अन नववर्षाच्या सूर्यदर्शनाची ओढ
नववर्षाचे स्वागत कळसूबाईच्या शिखरावर जावून गुढी उभारु न करण्यासह जागरूक नागरिक ह्या नात्याने मतदानाचा टक्का वाढावा असा संकल्प या दुर्गप्रेमी युवकांनी केला. गिर्यारोहक पहाटे घोटीतून निघत बारी येथून दीड तासात कळसूबाईच्या शिखरावर गेले. तेथे देवीचे विधीवत पूजन करु न नववर्षाचा संकल्प आणि मतदान जनजागृतीचा संकल्प केला.
कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर जावून नव्या वर्षाच्या स्वागताची गुढी उभारण्याची संधी मिळाली. मतदानाच्या प्रक्रि येत मतदारांची उदासीनता वाढत असल्याने सर्वांनी आपला अधिकार वापरावा म्हणून जनजागृती करण्याचा आम्ही संकल्प यावेळी केला. यासह कळसुबाई शिखरावर निसर्गाच्या सान्निध्यात सर्वोच्च गुढी उभारण्याचे भाग्य लाभले.
- भगीरथ मराडे, अध्यक्ष, कळसुबाई मित्रमंडळ.