पेठ येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:17 PM2018-03-29T14:17:24+5:302018-03-29T14:17:24+5:30

पेठ -सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समतिी सदस्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पेठ पंचायत समतिी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.

Taluka level education council at Peth | पेठ येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद

पेठ येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद

googlenewsNext

पेठ -सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समतिी सदस्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पेठ पंचायत समतिी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांचे हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.एकूण १३ केंद्रांतील कृतीशील शिक्षकांनी भाषा, गणति, इंग्रजी आदी विषयांचे शैक्षणकि साहित्यांचे दालने ऊभारली होती. अध्यापन पध्दतीतील विविध संबोध स्पष्ट करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणकि संकल्पना यातून मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग व सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अपंग समावेशीत शिक्षण अंतर्गत विविध योजना व साहित्यांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, गटशिक्षणाधिकारी कैलास माळवाळ, शालेय पोषण आहार अधीक्षक विलास साळी, विस्तार अधिकारी सुनिता राठोड, संतोष झोले, वसंत खैरणार, धनश्री कुवर ,भारती कळंबे ,मंगला गवळी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुभाष दळवी , प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.डी. शिंदे,यांचेसह केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र विषयतज्ञ, विशेषशिक्षक ,मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी, स्टॉलधारक मोठया संख्येने उपस्थित होते. संतोष झोले यांनी सुत्रसंचलन तर मोतीराम सहारे यांनी आभार मानले.
-----------------
गडिकल्ले निर्मिती ठरले आकर्षण
जोगमोडी बीटातील शिक्षकांनी तयार केलेली कोंडाणा किल्याची हुबेहुब प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरली. शिक्षण परिषदेत गड निर्मिती हा राज्यातील पेठ तालुक्यात पाहिलाच प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. विद्यार्थी- शिक्षकांबरोबर शाळा व्यवस्थापन समतिी सदस्यांनीही या गडाची माहिती जाणून घेतली. संतोष चव्हाण व विकास पाटील यांनी ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण केले. स्वराज्याचा इतिहास समजून घेतांना अशा प्रकारच्या प्रत्यक्ष अनुभवांची जोड देणे आवश्यक असल्याने प्रत्येक शाळेत किमान एक तरी गडाची निर्मिती करावी असे आवाहन संयोजकांनी केले.

Web Title: Taluka level education council at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक