तालुकास्तरीय अपंग समावेशित दिव्यांग क्रि डा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 07:49 PM2019-01-15T19:49:02+5:302019-01-15T19:51:30+5:30
इगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले.
इगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले.
शारिरीक व मानसिकदृष्या विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांसाठी दिव्यांग स्पर्धा या मुलांना प्रेरणा देणाºया आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केव्हाच बदलला असूनतेही प्रत्येक क्षेत्रात ते आता आपले स्थान पटकाऊ शकतात. असे खंडारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी लहान व मोठा गटातील मुले-मुलींच्या संगित खुर्ची, चमचा लिंबू, धावणे, बादलीत बॉल टाकणे, पासिंग द बॉल, वैयक्तिक गायन, नृत्य, समुहनृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रथम, व्दितीय, तृतीय क्र मांक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवविण्यात आले. प्रथम क्र मांक विजयी स्पर्धकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे विषयतज्ञ उत्तम आंधळे यांनी सांगितले.
परिक्षक म्हणून रविंद्र पाटील आणि कुंडलीक खाडे यांनी काम पाहिले. स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्र माचे सुत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी केले.
यावेळी शालेय पोषण आहार अधिक्षक प्रतिभा बर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, राजेंद्र नेरे, राजेश तायडे, कैलास सांगळे, बाप्पा मोरे, मुख्याध्यापक अरुण गायकवाड, शांता तुसे, स्मिता सोंडवले, मधूबाला कुडके, बाप्पा गतीर, संजय देवरे, युवराज सुर्यवंशी, गोरख खैरनार, प्रशांत भदाणे, सुरेखा गुंजाळ, संगिता केदार, सुनंदा अहिरे आदी उपस्थित होते.