दिंडोरीत शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:25 PM2020-12-18T17:25:53+5:302020-12-18T17:26:39+5:30

दिंडोरी : येथे शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक घेण्यात आली. यावेळी दिंडोरी शिक्षण विभागातील घटक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत दिंडोरी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जालिंदर सावंत यांनी केले.

Taluka level quality room meeting on behalf of education department in Dindori | दिंडोरीत शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक

दिंडोरीत शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठक

Next

या बैठकीसाठी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता शिवाजी औटी, अधिव्याख्याता डॉ. बाबासाहेब बडे, डॉ. साळुंखे, शिक्षणविस्तार अधिकारी सुषमा घोलप, मंगला कोष्टी, सुभाष पगार, सुनीता अहिरे, के. पी. सोनार, वंदना चव्हाण, केंद्रप्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांचा सत्कार गटशिक्षाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ .बाबासाहेब बडे यांनी ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. कनोज यांनी गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन नवोदय परीक्षेसाठी तालुक्यातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रविष्ट करावे, असे आवाहन केले. विस्तार अधिकारी सुभाष पगार यांनी सुवर्णमहोत्सवी लाभार्थी योजनेचा आढावा घेतला. के. पी. सोनार, सुनीता अहिरे, केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे,राजेंद्र गांगुर्डे, शरद कोठावदे, नामदेव गायकवाड, मीरा खोसे, देवराम शार्दुल आदींनी विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी केले.
यावेळी विषयतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, आरती दिंगोरे, प्रांजल कोथमिरे, अश्विनी जाधव, वैशाली तरवारे, कल्पना गवळी, समाधान दाते, दीपक पाटील, रिना पवार, पौर्णिमा दीक्षित आदी उपस्थित होते.

Web Title: Taluka level quality room meeting on behalf of education department in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.