येवल्यात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:04+5:302021-08-22T04:17:04+5:30
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास समिती ...
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास समिती सभापती संजय बनकर, बाळासाहेब लोखंडे, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक वसंतराव पवार, तहसीलदार प्रमोद हिले उपस्थित होते.
महोत्सवात शेतात सहज उपलब्ध असणाऱ्या परंतु आपणास परिचित नसणाऱ्या तसेच आरोग्यासाठी प्रचंड फायद्याच्या ४२ प्रकारच्या रानभाज्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक रानभाजी बनवण्याची पद्धत त्यांचे आरोग्याचे महत्त्व, त्या भाजीत असणारे घटक याविषयी माहिती देण्यात आली. आमदारद्वयी दराडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास समिती सभापती बनकर, लोखंडे यांची प्रसंगोचित भाषणे झाली.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी केले. सूत्रसंचालन भास्कर नाईकवाडी यांनी तर आभार प्रदर्शन जनार्दन शिरसागर यांनी केले. महोत्सवाचे संयोजन मंडळ कृषी अधिकारी के. वाय. सिद्दिकी, जे. आर. क्षीरसागर, एल. एस. निंगळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी दीपक लोणी, सुधीर जाधव, देवीदास निकम, वाल्मीक सांगळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो- २० येवला रानभाजी
200821\052220nsk_31_20082021_13.jpg
फोटो- २० येवला रानभाजी