तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 05:47 PM2018-12-29T17:47:22+5:302018-12-29T17:47:35+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील सारताळे येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण विभाग पंचायत समिती , तालुका विज्ञान अध्यापक संघ व कै. बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळा सारताळे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कुलच्या कृषी व जैविक शेतीच्या उपकरणाने अव्वल स्थान प्राप्त केले.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील सारताळे येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण विभाग पंचायत समिती , तालुका विज्ञान अध्यापक संघ व कै. बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळा सारताळे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कुलच्या कृषी व जैविक शेतीच्या उपकरणाने अव्वल स्थान प्राप्त केले. मनमाड येथील छत्रे न्यू.इंग्लिश स्कूलच्या खतयंत्राने द्वितीय तर साकोरा माध्यमिक विद्यालयाच्या बहुउद्देशीय कृषी यंत्राने तृतीय क्र मांक मिळविला आहे. जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी नांदगांव पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील उपस्थित होत्या.