वडनेर भैरव महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:48 IST2019-12-22T14:47:59+5:302019-12-22T14:48:17+5:30
वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वडनेर भैरव महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
वडनेर भैरव : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ डिसेंबर रोजी ४५ व्या चांदवड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद नाशिक, चांदवड पंचायत समिती आणि मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, वडनेर भैरव यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन येथे संपन्न होणार आहे.
मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार, चांदवड तालुक्याचे आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्र माचा बक्षीस वितरण समारंभ असणार आहे.
चांदवड तालुक्यातील २७० शाळांतून सुमारे २८२ विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती संचालक उत्तम भालेराव, प्राचार्य ए. एल. भगत यांनी दिली.