विल्होळी पंचायत समिती सदस्याचे वाहन जाळण्याचा प्रयत्न तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांकडून तपासणी
By admin | Published: February 2, 2015 12:09 AM2015-02-02T00:09:49+5:302015-02-02T00:12:09+5:30
विल्होळी पंचायत समिती सदस्याचे वाहन जाळण्याचा प्रयत्न तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांकडून तपासणी
नाशिक : विल्होळी गणातून विजयी झालेल्या पंचायत समिती महिला सदस्याच्या घरासमोर लावलेले चारचाकी वाहन अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे गौळाणे रोड परिसरात घडली़ याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव नानाजी रूपवते यांनी फिर्याद दिली आहे़ विल्होळी ग्रामपंचायतीसाठी जूनमध्ये मतदान होणार असून, सद्य:स्थितीत वॉर्डरचनेचे काम सुरू आहे़ त्यामुळे वाहन पेटविण्यापाठीमागे राजकीय पार्श्वभूमी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे़ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव रूपवते यांच्या पत्नी सुजाता रूपवते या विल्होळी गणातून पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेल्या आहेत़ विल्होळी गावातून जाणाऱ्या गौळाणे रोडवर त्यांचा बंगला असून, त्यांचे स्कॉर्पिओ वाहन (एमएच १५, ईजी १५३९) हे घरासमोर उभे होते़ रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या वाहनावर पेट्रोल ओतून ते जाळण्याचा प्रयत्न केला़ वाहन पेटविल्यानंतर एसीच्या गॅसचा स्फोट झाल्याने रूपवते कुटुंबीयांला जाग आली व त्यांनी पाणी टाकून आग विझविली़ यामध्ये वाहनाचे बोनेट व मशीनचे मोठे नुकसान झाले आहे़