टाळकुटे पूल ते स्वामीनारायण घाट झाला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:26 AM2021-02-28T04:26:32+5:302021-02-28T04:26:32+5:30

नाशिक : महापालिकेच्या वतीने दर शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्याचे सत्र कायम असून, शनिवारी (दि.२७) गंगाघाटावर टाळकुटे ...

The Talukute bridge to Swaminarayan Ghat was cleaned | टाळकुटे पूल ते स्वामीनारायण घाट झाला स्वच्छ

टाळकुटे पूल ते स्वामीनारायण घाट झाला स्वच्छ

Next

नाशिक : महापालिकेच्या वतीने दर शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्याचे सत्र कायम असून, शनिवारी (दि.२७) गंगाघाटावर टाळकुटे पूल ते स्वामी नारायण घाट अशी स्वच्छता मोहीम राबवून सुमारे साडचार टन कचरा संकलित करण्यात आला.

सकाळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत साडेचार टन कचऱ्याबरोबरच प्लास्टीक कचरा नऊ किलो आणि तीन टन मातीही काढण्यात आली. या मोहिमेत महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ.प्रवीण अष्टीकर, घनकचरा विभागाच्या संचालक डॉ.कल्पना कुटे, पूर्व विभागीय कार्यालयाचे अधीक्षक राजाराम जाधव, विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्यासह नाशिक पूर्व विभाग आणि राजीव गांधी भवनातील २२० कर्मचारी, वॉटर ग्रेस कंपनीचे वीस कर्मचारी तसेच ब्लॉगर्स ग्रुपचे २५ सभासद सहभागी झाले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध सेवाभावी संस्था सहभागी होत आहेत. गेल्या शनिवारी (दि.२०) झालेल्या मोहिमेत तर आयुक्त कैलास जाधव अन्य मान्यवर उपस्थित होते.

===Photopath===

270221\27nsk_7_27022021_13.jpg

===Caption===

नाशिक महापालिकेच्या वतीने गोदाकाठी राबविण्यात येत असलेली मोहिम.

Web Title: The Talukute bridge to Swaminarayan Ghat was cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.