तळवाडे(त्र्यंबक)ला कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात
By admin | Published: July 21, 2016 01:13 AM2016-07-21T01:13:46+5:302016-07-21T01:25:21+5:30
तळवाडे(त्र्यंबक)ला कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात
त्र्यंबकेश्वर : गेली दहा वर्षे तळवाडे(त्र्यंबक) या संवेदनशील गावात कॉँग्रेसची सत्ता होती. तथापि, शिवसेना-भाजपाच्या युवा वर्गाने ती संपुष्टात आणली आहे.
ड्रायव्हर असलेल्या बाळासाहेब बोडके यांनी गावात हे परिवर्तन घडवून आणले.
तळवाडे (त्र्यंबक) हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. आजच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत तळवाडे (त्र्यंबक) येथे दोन प्रभाग असून, एका प्रभागात तीन-तीन सदस्य निवडले गेले आहेत. या सहा सदस्यांमधून सरपंचपदी ज्ञानेश्वर भिवसेन आणि उपसरपंच म्हणून बाळासाहेब बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी लहानू डगळे, पार्वताबाई अहेर, जिजाबाई गांगुर्डे, इंदूबाई डगळे या सदस्यांचा समावेश आहे. भाजपाचे युवराज कोठुळे, माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, किरण अडसरे, रामनाथ बोडके यांचा सत्तांतर घडविण्यात मोठा हातभार आहे. या निवडीनंतर तळवाडे (त्र्यंबक) येथे जल्लोष करण्यात आला व गावातून मिरवणूक काढण्यात आली.