नारंदी नदीत साकारलेला बंधारा भरला तुडुंब
By admin | Published: September 9, 2016 10:53 PM2016-09-09T22:53:45+5:302016-09-09T22:53:59+5:30
नारंदी नदीत साकारलेला बंधारा भरला तुडुंब
येवला : दुष्काळामुळे बंधाऱ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गतीयेवला : पिंपळगाव जलालला नारंदी नदीवर नव्याने माती-दगड बंधारा साकारला आहे. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीचा हातभार लावल्याने दोन - अडीच लाख रु पये खर्च करून व दराडे बंधूंनी स्वखर्चाने दिलेले जेसीबी यातून बंधारा पहिल्याच वर्षी तुडुंब भरला आहे. या पाण्याचे नुकतेच जलपूजन करण्यात आले. पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ व दराडे बंधूनी केलेल्या प्रयत्नामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी याचा लाभ होणार आहे.
अनेक वर्षातील ग्रामस्थांची मागणी मागील उन्हाळ्यात पूर्ण झाली आहे. उंदीरवाडी व पिंपळगाव जलाल शिवारात नारंदी नदीचे पाणी डोळ्यादेखत वाहून जात असल्याने पाणी संपले कि आजुबाजूच्या शेतकरयांना कोरडी नदी पाहवी लागत असे. वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी या शिवारात बंधारा करण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वास जात नव्हती. मात्र दुष्काळामुळे बंधाऱ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
यापूर्वी राजापूर, सायगाव येथील बंधारे दुरूस्ती व गाळ काढण्याचे काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेन्द्र दराडे व संचालक किशोर दराडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वताची पुंजी लावत पूर्ण केले. पिंपळगाव ग्रामस्थांनी दराडे यांच्याकडे नारंदी बंधार्याच्या कामाची मागणी केली. इंधनासह मोफत जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले गेले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुझांर देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, युवा नेते अमोल सोनवणे, बाबा डमाळे, सूर्यभान जगताप आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी शरद लहरे, ज्ञानेश्वर खोकले, सम्राट देशमुख, नारायण भोरकडे, अशोक भोरकडे, दत्तू भोरकडे, दिलीप भोरकडे, साखरचंद खुटे, पोपट वाघ, वसंत वाघ, सचिन देशमुख, संजय खुटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)