जमावबंदीचा आदेश डावलून तांगा शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:37 PM2020-04-26T23:37:29+5:302020-04-26T23:37:43+5:30
दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील शेतमालकाला पूर्वसूचना न देता तांगा शर्यत भरविल्याप्रकरणी व लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील शेतमालकाला पूर्वसूचना न देता तांगा शर्यत भरविल्याप्रकरणी व लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हस्ते दुमाला येथे दगडमाड शिवारात शेतीक्षेत्र गट क्र मांक २१० हे सोनीराम गावित यांच्या मालकीचे आहे. त्यांची कोणतीही परवानगी न घेता रामभाऊ गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, बाळू राऊत (सर्व रा. हस्ते दुमाला) यांनी लॉकडाउन असताना जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसबून तांगा शर्यतीचे आयोजन केले होते. घोडा, बैल, भिरके यांना या ठिकाणी आणण्यात आले व शर्यत सुरू करण्यात आली. शर्यत ऐन रंगात असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस पाहताच बघ्यांनी पळ काढला. मात्र, सहा दुचाकी व तीन पिकअप जीप पोलिसांनी जप्त केल्या. प्रकाश कडाळे (हस्ते दुमाला), जयराम गवळी (टाक्याचा पाडा), मोहन राऊत (नागाईपाडा), पांडुरंग झिरवाळ (खुंटीचा पाडा), रामचंद्र राऊत (चिमणपाडा) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.