अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:01 AM2018-12-14T02:01:17+5:302018-12-14T02:01:32+5:30

पिण्याचे पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का? याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.

Tanker clearance order inevitable | अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश

अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजुरीचे आदेश

Next

नाशिक : पिण्याचे पाणीटंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक असल्याने अपरिहार्य परिस्थितीतच टँकर मंजूर करण्याचे तसेच तत्पूर्वी अन्य उपाययोजनातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का? याबाबत तपासणी करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.
शासनाने दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन निर्णय काढून दुष्काळ जाहीर केला आहे. अशा जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिले आहेत. मात्र टँकर मंजूर करणे अतिशय खर्चिक उपाययोजना असल्याने ही उपाययोजना अपरिहार्य परिस्थितीतच कमीत कमी खर्चाची उपाययोजना म्हणून मंजूर करणे आवश्यक आहे.
याबाबत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप सचिवानी सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.  यामध्ये टँकर मंजूर करण्यापूर्वी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, बंद असलेल्या प्रादेशिक योजना कार्यान्वित करणे याबाबत तपासणी करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे का याबाबत पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तसेच ज्या ठिकाणी टंचाई अंतर्गत घेण्यात येणाºया आकस्मिक उपाययोजना घेऊनही पाणी उपलब्ध होत नसल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे करण्याचे सूचित करण्यात आले. आहे.
पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करताना पशुधनासाठी लागणाºया पाण्याची गरज विचारात घेऊन उपाययोजना राबविण्याचे तसेच टँकर मंजूर करताना उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Web Title: Tanker clearance order inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.