हरसूल भागातल्या शेती पिकांवर टाक्या, तांबोरा रोगांचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:21+5:302021-09-10T04:19:21+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील शेतीपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, टाक्या, तंबोरा रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील शेतीपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, टाक्या, तंबोरा रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
हरसूलसह परिसरात भात पिकाबरोबर नागली, वरई, कुळीद, उडीद, भुईमूग, तूर तसेच आंबा पिकांची शेतकऱ्यांनी मोठी लागवड केली आहे. सुरुवातीपासून समाधानकारक पडणाऱ्या पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी आशेची पेरणी केली आहे. मात्र ऐन पिकांच्या लागवडीच्या वेळी पावसाने दडी मारत शेतकऱ्यांची झोप उडविली. सद्यस्थितीत अवनी केलेल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हरसूल परिसरातील ठाणापाडा, दलपतपूर, चिरापाली, सापतपाली तसेच तोरंगण परिसरातील भात पिकांवर टाक्या, तांबोरा, करपा जातीच्या रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येत आहेत. तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
कोट... हरसूल भागातील शेतीपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून टाक्या, तांबोरा तसेच करपा रोगांची लक्षणे दिसून येत आहेत. काही ठिकाणी भातपीक अगदी फुलोऱ्यात आले आहे. कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात याव्यात. - इरफान शेख, माकप जिल्हा सचिव
080921\12261545-img-20210908-wa0014.jpg
छायाचित्र : (सुनिल बोडके) : दलपतपूर येथे टाक्या रोगाचा प्रादुर्भाव दाखविताना शेतकरी.