येवला तालुक्यातील ताराबाई कानडे यांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 06:53 PM2018-09-19T18:53:49+5:302018-09-19T18:54:24+5:30
लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.

ही महिला अत्यंत गरीब असुन लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी तसेच निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले व डॉ. एच. एल. गायकवाड यांच्यासह व कर्मचारी यांनी तातडीने विविध दवाखान्यात माहीती घेतली असता रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले. स्वाईन फ्लुचे स्थानिक रूग्ण नाहीत परंतु लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत.
लासलगाव परिसरातल्या रूग्णांनी किरकोळ आजार असला तरी तातडीने डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्वरीत उपचार घ्यावेत व आपल्या राहत्या घराचे आसपास पाणी साचून देवू नये तसेच सात दिवसाचे आत पाणी रिकामे करून ताजे पाणी
स्वच्छ करून प्यावे असे आवाहन निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
लासलगाव परिसरातील विविध गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून सर्दी खोकला यासह आजारी होणाºया रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रूग्णांनी घरीच परस्पर औषधे घेवू नयेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.