एरंडगाव येथे अंगणवाडी शिक्षिकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 06:57 PM2021-01-19T18:57:47+5:302021-01-19T19:01:20+5:30
एरंडगाव : येथे अंगणवाडी शिक्षिकांसाठी कठपुतली प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
एरंडगाव : येथे अंगणवाडी शिक्षिकांसाठी कठपुतली प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली व शिव उमा बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येवला तालुक्यातील जळगांव व मुखेड विभागातील अंगणवाडी शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण शिबीराचे आयेजन कण्यात आले होते.
शिबीराचे उदघाटन प्रकल्प अधिकारी भगवान गर्जे यांचे हस्ते झाले. कलाकार अशोक मांजरे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा स्पष्ट केली. सीसीआरटी शिष्यवृत्तीधारक अरुंधती तांबे यांनी पपेट शोचे प्रात्यक्षिक दाखविले. शितल कोळस यांनी कागदाच्या लगद्याचा मुखवटा कसा तयार करायचा याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी पपेटियर योगेश मांजरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी गर्जे, पर्यवेक्षिका ए. व्ही. आहीरराव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी आन्सार शेख यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका वंदना शिंपी यांनी केले. तर आभारप्रदर्शन साक्षी आढाव यांनी केले.